विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन, नागपूर येथे आज राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्ताने शपथ घेण्यात आली. तसेच या दिवसाचे आणि मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस विभागातर्फे करण्यात आले.
यावेळी डॉ. संजय सिंगणजुडे, रासेयो कार्यक्रमाधिकारी, यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
याप्रसंगी डॉ. मस्के, प्रा. सोरते, प्रा. दाते आणि अन्य उपस्थित होते.