Vaidarbhiya Mahila Sanstha’s Women’s College of Arts & Commerce, Nagpur and its Job Placement Cell organized ‘Mega Job Fair’ in association with Magic Bus India Foundation on 21 st February 2023. Its aim was to connect local job seekers and employers. It was a huge success as 43% students have been selected and shortlisted in the Job Fair. It was organized for Graduate and Postgraduate students of the institute and students from diverse courses like BCom, BA, and MCom participated in the job drive. In the mega Job Fair, five companies had participated including Calibre HR, SM Recruitment, Vindhya, Shreevalli Infra, Saath Outsourcing, and Anandi Staffing Solutions and many others. The Event was inaugurated by Hon. President Savitritai Rokde and Principal Dr. N. R. Dixit. It was coordinated by Placement Officer Dr. M. A. Khan in association with Pankaj Choudhari, Akash Madewar and Priti Parate of Magic Bus India Foundation. Through their speeches, President and Principal motivated the students to participate for maximum companies and guided them. They congratulated the selected candidates & wished them huge success for their career journey. Total 105 students participated in the Job Fair. Sandip Wagh, Sanket Bhalame, Shadab Sheikh, Sandip Shende, Vidisha Tembhurkar and Amol Tidke were the panellists for the interviews from the companies. The program was successful due to the remarkable contribution of Dr. Milind Gulhane, Dr. Prashant Gulhane, Dr. Bhende, Dr. Pawar, Dr. Gaikwad, Dr. Shamkure, Dr. Singanjude, Dr. Raut, Prof. Agrawal, Prof. Kotangale, Prof. Tripathi and others.
विमेन्स कॉलेजमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन वैदर्भीय महिला संस्थेच्या विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नागपूर आणि जॉब प्लेसमेंट सेलने 21 फेब्रुवारी 2023 रोजी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने ‘मेगा जॉब फेअर’ आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळावाचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक नोकरी शोधणारे आणि नियोक्ते यांना जोडणे हा होता. या मेळाव्यात एकूण 43% विद्यार्थी निवडले गेले जे कि महाविद्यालयाचे एक मोठे यश मानल्या जात आहे. संस्थेच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात बी.कॉम, बीए आणि एम.कॉम सारख्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मेगा जॉब फेअरमध्ये कॅलिबर एचआर, एसएम रिक्रूटमेंट, विंध्या, श्रीवल्ली इन्फ्रा, साथ आऊटसोर्सिंग आणि आनंदी स्टाफिंग सोल्युशन्ससह इतर कंपन्यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अध्यक्षा सावित्रीताई रोकडे व प्राचार्य डॉ.एन.आर. दीक्षित यांनी केले. मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे पंकज चौधरी, आकाश मडवार आणि प्रीती पराते यांच्या सहकार्याने प्लेसमेंट ऑफिसर डॉ एम ए खान यांनी या मेळाव्याचे संयोजन केले. अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कंपन्यांमध्ये मुलाखत देण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत भरीव यशासाठी शुभेच्छा दिल्या. रोजगार मेळाव्यात एकूण 105 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कॉर्पोरेट मुलाखतीसाठी संदीप वाघ, संकेत भलमे, शादाब शेख, संदीप शेंडे, विदिशा टेंभुरकर आणि अमोल तिडके हे निवड समितीचे सदस्य होते. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डॉ.मिलिंद गुल्हाने, डॉ.प्रशांत गुल्हाने, डॉ.भेंडे, डॉ.पवार, डॉ.गायकवाड, डॉ.शामकुरे, डॉ.सिंगनजुडे, डॉ.राऊत, प्रा. अग्रवाल, प्रा. कोटांगळे, प्रा.त्रिपाठी आदींनी मोलाचे सहकार्य केले.