विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन, नागपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्राध्यापक प्रणय दाते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सरांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध समजून सांगितले आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचे कर्तव्य काय आहे. हे विस्तारित रूपाने समजून सांगितले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त कर्तव्याचे शपथ घेण्यात आली. तसेच दिनांक 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर ला ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत स्वच्छता अभियानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. त्याचे काही क्षणचित्रे.