दिनांक 5 डिसेंबर 2025 शुक्रवार पासून क्रीडा विभागाकडून क्रीडा महोत्सव सुरू झाला. त्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. जसे बॅडमिंटन, रनिंग ,तीन पायाची दौड, रस्सीखेच, कबड्डी, क्रिकेट. अशा अनेक स्पर्धेचे आयोजन केलेले होते. याचा समारोप दिनांक 10 डिसेंबर 2025 बुधवार रोजी क्रीडा महोत्सवाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी अत्यंत हिरीहिरीने सहभाग घेतलेला होता. तसेच महाविद्यालयाचे सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राध्यापक सुद्धा सहभागी झालेले होते. अशा प्रकारे पाच दिवसाचा क्रीडा महोत्सव घेण्यात आला.